एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प
प्रकल्प उद्धीष्ट- जवळच्या २-३ गावातील ३०० कुटुंबे ज्यांच्याकडे २-३ उपजीविका उपक्रमात समाविष्ट आहेत असा एक IFC प्रभाग तयार करणे व वैविध्यपूर्ण उपजीविकेच्या उपक्रमांमध्ये सुधारणा, विस्तार व मूल्य साखळी विकसित करणे.
महिलांना शेतकरी दर्जा प्राप्त करून देणे, त्यांना कृषि व पशुपालन विषयक शाश्वत शेती, बकरीपालन, व परसातील कुक्कुटपालन इ. विविध संधी निर्माण करणेसाठी मार्गदर्शन केले जाते. गाव स्तरावर उपजीविकेचे विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्राम संघ व प्रभाग संघ, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना अर्थसहाय्य व कृतीसंगमच्या माध्यमातून शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्साठी मार्गदर्शनातून प्रात्यक्षिक प्लॉट तयार करणे,संकलन केंद्र उभारणे ,शेती अवजार बँक स्थापन करणे,महिला शेतकऱ्यांची शेती शाळा घेणे ,विविध संस्थाच्या माध्यमातून महिला शेतकर्याकरिता तांत्रिक प्रशिक्षणासाठी नियाजन करणे इ.उपक्रम राबविले जातात.